
कामेरी : राज्यातील वाढीव टप्पा अनुदानावर असणाऱ्या शाळेसाठी ९७० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र शासन निर्णय जाहीर केला नसल्याने आज आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वात मंत्रालयात शिक्षण मंत्री व प्रधान सचिव यांची भेट घेतली. यावेळी वित्त विभागाकडे फाईल आली असून लवकरच ती शिक्षण विभागाकडे सुपूर्द करून शासन निर्णय पारित केला जाईल, अशी माहिती शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक प्रा. खंडेराव जगदाळे यांनी दिली.