साखरपा : स्वातंत्र्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात राहिलेला लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. १०५ हुतात्मे झालेला तो लढा. त्याची सुरुवात झालेला मुंबईचा (Mumbai) ऐतिहासिक मोर्चा आणि त्या मोर्चात सहभागी झालेले आंदोलक म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील दत्ताराम कोळवणकर. त्यांनी त्या आंदोलनाच्या आठवणी महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) निमित्ताने जागवल्या.