बेकायदा उभारण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटवा अन्यथा भगवा ध्वज फडकविण्यात येईल

अमृत वेताळ
Tuesday, 29 December 2020

कन्नड संघटनेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी मराठी भाषीकांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेसमोर काल बेकादेशीरत्या लाल पिवळा ध्वज उभारला आहे.

बेळगाव : महापालिकेसमोर बेकायदा उभारण्यात आलेला लाल पिवळा ध्वज 31 तारखेपर्यंत हटविण्यात यावा, अन्यथा शुक्रवार (ता.1) जानेवारीला त्याच ठिकाणी भगवा ध्वज फडकाविण्यात येईल. सोमवार (ता.28) महापालिकेसमोर लाल पिवळा ध्वज उभारुन कन्नडींगानी  राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा देखील अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लाल पिवळा ध्वज तातडीने हटवावा. अशा मागणीचे निवेदन मंगळवार (ता.29) पोलीस आयुक्‍तांना महाराष्ट्र एकिकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आले. 

कन्नड संघटनेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी मराठी भाषीकांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेसमोर काल बेकादेशीरत्या लाल पिवळा ध्वज उभारला आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषीकांची मने दुखावली आहेत. कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना ध्वज उभारणाऱ्या कन्नडींगाना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांची लाठ हिसकावून घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एक देश एक राष्ट्रध्वज असताना कर्नाटक राज्याचा स्वयंमघोषीत असलेला लाल पिवळा ध्वज महापालिकेसमोर उभारुन तिरंगा ध्वजाचा अवमान करण्यात आला आहे. तसेच यावेळी कन्नडीगांनी राष्ट्रगीताचाही अवमान केला असून संबधीतावर कारवाई होणे गरजेचे आहे. याचप्रमाणे प्रादेशीक आयुक्‍त कार्यालय आणि रेल्वे स्थानक आवारात देखील बेकायदा लाल पिवळा ध्वज उभारण्यात आला आहे. 

राष्ट्रीय एकात्मतेला धक्‍का पोहचविण्याचा प्रयत्न होत असून त्यातच आता महापालिकेसमोर पुन्हा लाव पिवळा ध्वज उभारुन आगळीक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन राष्ट्रध्वजाचा होणार अवमान रोखवा तसेच, तातडीने महापालिकेसमोरील तो लाल पिवळा ध्वज हटवावा, अशी मागणी पोलीस आयुक्‍तांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. 

हेही वाचा- कोल्हापूरच्या ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या पन्हाळा आणि पावनगड पाहता येतो या वास्तुतून -

पोलीस खाते आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने येत्या 31 डिसेंबर पर्यंत सदर लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा, अन्यथा त्याठिकाणी भगवा ध्वज देखील फडकाविण्यात येईल, असा इशारा देखील युवा समितीच्यावतीने देण्यात आला. पोलीस आयुक्‍त डॉ. के. त्यानगराज यांनी निवेदनाचा स्विकार करुन म्हणणे ऐकून घेतले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, कार्यदर्शी शुभम शेळके, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, आर. आय. पाटील, मदन बामणे, राजू बिर्जे आदी मराठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Ekikaran Yuva Samiti demand for red yellow flag belgaum