
Farmers blocking highway expansion work between Vita and Bastawade, demanding proper land acquisition.
Sakal
सांगली: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विटा, कवठेमहांकाळ महामार्गामधील विटा, बस्तवडे फाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यालगत असलेल्या बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना, नोटीस न देता, भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया न राबविता शेतकऱ्यांच्या हद्दीत काम करणाऱ्या संबंधित कंत्रादारांचे काम बंद पाडले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वात मंगळवारी तासगाव तालुक्यातील हातनूर येथे होनाई मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.