Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

Maharashtra FDA crackdown under Tukaram Mundhe : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नभेसळ, बेकायदेशीर औषधविक्री, हॉस्पिटल मेडिकल, खाद्यतेल गुणवत्ता आणि ग्राहक संरक्षणासाठी राज्यभर कठोर कारवाई सुरू असून सकारात्मक बदल दिसू लागले आहेत.
Who is Tukaram Mundhe?

Who is Tukaram Mundhe?

esakal

Updated on

Tukaram Mundhe FDA action : कोणा एकाच्या इच्छेमुळे; कोण आला आणि गेला म्हणून काय फरक पडतो, असं सहज म्हटलं जातं; परंतु फरक पडतो जेव्हा एखादा माणूस तीव्र इच्छाशक्तीला कृतीची जोड देतो. तसा त्याचा पूर्वेतिहास लागतो. ताजे उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार घेतला आणि राज्यभरात त्याच्याशी निगडीत सर्व विभागांमध्ये हालचाल सुरू झाली. झटक्यात बदल दिसू लागला. प्रशासन जिवंत असल्याचे जाणवू लागले. छापेमारी, तपासणी, नोटिसा, निलंबन धडाका सुरू आहे. हा धडा गेंड्याच्‍या कातडीच्या प्रशासनाला आणि स्वतःचे नागरिकत्वच विसरून गेलेल्या सर्वांनाच आहे. फरक पडतो... फक्त ‘तुकाराम’ लागतात, हेच खरे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com