Maharashtra kesari : जोतिबाला अर्पण करणार एक किलो चांदीची गदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

Maharashtra kesari : जोतिबाला अर्पण करणार एक किलो चांदीची गदा

जोतिबा डोंगर : महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान शिवराज राक्षे हा दख्खनचा राजा श्री जोतिबा चरणी एक किलो वजनाची चांदीची गदा अर्पण करणार असून, तो गेल्या महिन्यात येथे नवस बोलण्यासाठी आला होता. पुण्यातल्या एका कारागिराकडे चांदीची गदा बनवण्यासाठी दिली असून, ती तयार झाली की शिवराज मिळालेल्या नव्या कोऱ्या गाडीतून डोंगरावर येणार आहे.

मूळचा पुण्यातील खेड भागातील शिवराज वर्षातून तीन-चार वेळा तो जोतिबा दर्शनासाठी येतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी तर त्याने जोतिबा देवाचे नामस्मरण केल्याचे त्याने आवर्जून सांगितले. अवघ्या ५५ सेकंदात त्याने हे महाराष्ट्र केसरीचे मैदान जिंकले आणि तो महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला होता. जोतिबा देवाच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र केसरी होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मला आता ऑलिंम्पिक मध्ये खेळायचे आहे. भारत देशाचे नाव मोठे करायचे आहे. त्यासाठी आतापासून माझी तयारी सुरू आहे, असे त्याने सांगितले.