

इचलकरंजी - येथील विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे 7500 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
या मतदार संघात भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर वर त्यांच्यात लढत आहे. पहिल्या फेरीत भाजप उमेदवार सुरेश हाळवणकर यांना ६२१४ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांना ८५१९ मते मिळाली त्यांनी २३७५ मतांनी आघाडी घेतील आहे.
या मतदार संघात यंत्रमाग उद्योगाला काही वर्षात मोठी अवकळा आल्याचा आरोप अपक्ष उमेदवार माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केला, तर भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी वस्त्रोद्योगाला पाच ते सात वर्षांत आलेला निधी, शासनाच्या वेगवेगळ्या योजना यावर अधिक भर दिला. यंत्रमाग उद्योग, वारणा पाणी योजना, पालिकेचे आयजीएम रुग्णालय हस्तांतरण यावरच प्रचाराचा रोख होता.
या वेळी जातनिहाय समीकरण फारसे महत्त्वाचे ठरलेच नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले अनेकजण भाजपमध्ये गेले, तर नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे गटाने यावेळी भूमिका बदलून आवाडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले. राष्ट्रवादीचा मदन कारंडे गट जाहीरपणे आवाडे यांच्या प्रचारात सक्रिय आहे. जांभळे गटाने हाळवणकर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडी धर्म दिसत नाही. अपक्ष आणि भाजप उमेदवारांबरोबरच काँग्रेसचे राहुल खंजिरे आणि हिंदू महासभेचे उमेदवार बाळ महाराज ऊर्फ संतोष कोळी यांनीही प्रचाराने शहर आणि परिसर ढवळून काढला.
या दोघांची मते दोन्ही उमेदवारांना कितपत निर्णायक ठरतात हेही महत्त्वाचे आहे. आमदार सुरेश हाळवणकर आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर प्रचार आणि सभाबरोबरच सोशल नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात वापर केला. हाळवणकर यांनी विकासकामाचा अजेंडा आणि त्यातून प्रगती केलेले शहर याचा चेहरा सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणला. आवाडे यांनी उद्योगातून शहराची झालेली वाताहत आणि दहा वर्षे शहर कसे मागे गेले यावर प्रचाराचा रोख सोशल मीडियातून ठेवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.