esakal | शिराळा : मानसिंगराव नाईक आघाडीवर | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

शिराळा : मानसिंगराव नाईक आघाडीवर | Election Results 2019

शिराळा विधानसभा मतदार संघात एकूण ९ उमेदवार आहेत. त्यापैकी खरी लढत ही भाजपचे शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक व अपक्ष सम्राट महाडिक यांच्यात आहे.

शिराळा : मानसिंगराव नाईक आघाडीवर | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिराळा - मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी 7161 मतांनी आघाडी घेतली आहे. येथे भाजपचे शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्यातच खरी लढत होत आहे. मात्र अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याची चर्चा आहे. 

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते - 
शिवाजीराव नाईक(भाजप) १२६२७
मानसिंगराव नाईक(राष्ट्रवादी)१९७८८
सम्राट महाडिक(अपक्ष)८१०७
लहू वाघमारे(बहुजन समाज पार्टी) १०५

शिराळा विधानसभा मतदार संघात एकूण ९ उमेदवार आहेत. त्यापैकी खरी लढत ही भाजपचे शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक व अपक्ष सम्राट महाडिक यांच्यात आहे. शिवाजीराव नाईक यांना सत्यजित देशमुख यांची तर मानसिंगराव नाईक यांना जयंतराव पाटील यांची साथ होती.

सम्राट महाडिक यांच्या माध्यमातून वाळव्यातून प्रथमच तगडा उमेदवार असल्याने त्यांची उमेदवारी फटका  भाजपला बसला आहे. शिराळ्यापेक्षा वाळवा तालुक्‍यातून जास्तीत  जास्त मताधिक्‍य मिळवण्यासाठी सर्वांनीच पायाला भिंगरी होती.

loading image
go to top