श्रीनिवास पाटलांवर मतांची बरसात सुरुच ; उदयनराजे पिछाडीवर I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

धो- धो पडणाऱ्या पावसात पाटील यांनी पावसाप्रमाणे मला मत द्या असे आवाहन केले हाेते. 

सातारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस बालेकिल्ला राखणार, की भाजप, शिवसेना या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

सातारा लाेकसभा पाेटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भाेसले हे 32 हजार 500 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीनिवास पाटील यांना मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली आहे. 

धो- धो पडणाऱ्या पावसात पाटील यांनी पावसाप्रमाणे मला मत द्या असे आवाहन केले हाेते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Satara trends early morning