esakal | रामराजेंना विकासकामांची पावती दीपक चव्हाणांच्या विजयाने निश्चित I Election Result 2019
sakal

बोलून बातमी शोधा

deepak chavan

एकूणच फलटण तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अद्यापही घट्ट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

रामराजेंना विकासकामांची पावती दीपक चव्हाणांच्या विजयाने निश्चित I Election Result 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फलटण - सुरवातीपासून अतितटीची व काटेकी टक्कर वाटणारी फलटण. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिपक चव्हाण ३१ हजार मताने विजयी झाले त्याच बरोबर विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या २५ वर्षात केलेल्या विकासकामांची पावती फलटणकर जनतेने मताधिक्य देऊन दिली असली तरी फलटण तालुका विकासाच्या बाजूने असल्याचे दर्शवुन देत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले दरम्यान कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात़ साजरा केला.

फलटण कोरेगाव विधानसभा निवडणूक सुरवातीपासून विविधांगी चुरशीची होईल अशी अपेक्षा होती पण फलटणकर मतदारांनी लोकसभा निवडणुकीचा काहीही मतीतीर्थ न ठेवता फलटण मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासालाच प्राधान्य देणारा असल्याचे निकालावरून दाखऊन दिले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण व राष्ट्रीय कॉग्रेसचे दिगंबर आगवणे यांच्यातच लढत झाली होती त्यावेळी चव्हाण यांना ९२ हजार ९१० तर निकटचे प्रतिस्पर्धी आगवणे यांना ५९ हजार ३४२ मते पडली होती. आज निकाल जाहीर झालेल्या निवडणुकीत चव्हाण यांना १ लाख १६ हजार ४०१ तर आगवणे यांना ८६ हजार ११३ मते मिळाल्याचे दिसून येते. एकूणच तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अद्यापही घट्ट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३१ हजार ६८५ मतदार असून पैकी २ लाख १३ हजार७०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातच ४ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले त्यातच त्यांना मिळालेल्या मतांमधे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या पेक्षा १ हजार ११३ मते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अधिक मिळाली होती.
त्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार काय कौल देणार याची चिंता राष्ट्रवादीला भेडसावत होती पण तालुक्यात आलेले धोम बलकवडी प्रकल्पाचे पाणी, वाढीव ऊसाचे क्षेत्र, औद्योगिक वसाहत, युवकांच्या हाताला काम या बाबीकडे मतदारांनी पाठ न फिरवता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे.