Vidhan Sabha 2019 : कऱ्हाड दक्षिण : सत्तासंघर्ष टोकदार

सचिन शिंदे
Friday, 18 October 2019

माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाने केलेली बंडखोरी, भाजपचे शक्तिप्रदर्शन व प्रचारातली आघाडी आणि काँग्रेसच्या छुप्या प्रचाराची व्यूहरचना यामुळे मतदारसंघातील तिरंगी लढत चुरशीची ठरली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना घेरण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली. त्यातच उंडाळकरांचे पुत्र ॲड. उदयसिंहांच्या बंडखोरीने चुरस आणि राजकीय गुंतागुंतही वाढली.

विधानसभा 2019 : माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाने केलेली बंडखोरी, भाजपचे शक्तिप्रदर्शन व प्रचारातली आघाडी आणि काँग्रेसच्या छुप्या प्रचाराची व्यूहरचना यामुळे मतदारसंघातील तिरंगी लढत चुरशीची ठरली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना घेरण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली. त्यातच उंडाळकरांचे पुत्र ॲड. उदयसिंहांच्या बंडखोरीने चुरस आणि राजकीय गुंतागुंतही वाढली. चव्हाणांपासून आमदार आनंदराव पाटील, प्रा. मच्छिंद्र सकटे, नगरसेवक राजेंद्र यादव यांचे गट दुरावलेत. दुसरीकडे, भाजपने गतवेळी चव्हाणांनी पराभूत केलेल्या अतुल भोसलेंनाच पुन्हा रिंगणात उतरवलंय. पंढरपूरच्या देवस्थान समितीचे (विठ्ठल मंदिर) अध्यक्षपद त्यांना दिलंय, त्यांच्यामागे पक्षाने उभी केलेली ताकद आणि कौटुंबिक वारस हे त्यांचे मोठे बळ आहे.

पृथ्वीराज चव्हाण 
बलस्थाने

    स्वच्छ प्रतिमा, पारदर्शी कारभार. 
    माजी मुख्यमंत्री म्हणून व्यक्तिमत्त्वाची छाप. 
    शहरात प्रभाव पाडणारे काम. 
    गटातटाचा विचार न करता केलेली कामे.

उणिवा
    पक्षातील गटातटांतील वाद रोखण्यात अपयश. 
    दुरावलेले नगरसेवक. 
    पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्षांनी केलेला भाजप प्रवेश. 
    पक्षातून होणारी बंडखोरी रोखण्यात आलेले अपयश. 

अतुल भोसले 
बलस्थाने

    अतुल भोसलेंना भाजपने दिलेली ताकद. 
    कऱ्हाड नगरपालिकेतील भाजपची सत्ता. 
    काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आलेले यश. 

उणिवा
    शहरी भागामध्ये संपर्क मर्यादीत. 
    विकासकामांवरून एकमेकांवर होणारे आरोप. 
    व्यक्तीगत पातळीवर सोशल मीडियावर होणारी टीका. 
    पदाधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 karhad south politics