Maharashtra RERA project completion deadline 2026
esakal
सांगली : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे बांधकाम प्रकल्पांच्या कामकाजावर परिणाम झाल्याने बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाने (महारेरा) घेतला आहे. ‘महारेरा’ने पात्र नोंदणीकृत प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या मुदतीत चार महिन्यांची स्वयंचलित मुदतवाढ जाहीर केली (Maharashtra RERA four month automatic extension) आहे.