Video : दमल्या भागलेल्यांना चैतन्य देऊन गेला नागेश्‍वर

सिद्धार्थ लाटकर
Saturday, 22 February 2020

हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी नागेश्‍वराचे दर्शन घेतले आणि वासोटा मार्गे, चोरवणे मार्गे तसेच दगड गोट्यांच्या ओढ्यातील मार्गातून आपला परतीचा प्रवास पार पाडला.  

सातारा : हिमालयातील कैलास दर्शन करणे हे पुण्याचे समजले जाते. कैलास दर्शनासाठी कोणता खडतर प्रवास करावा लागतो याची अनभुती सातारा जिल्ह्यातूनही घेता येते. ती किल्ले वासोटा मार्गे नागेश्‍वर सुळक्‍याच्या कड्यात जाताना. ही प्रचीती महाशिवरात्रीला एकाच दिवसात सुमारे पाच हजार गिरीप्रेमींनी घेतली.
 
उंच करवतकडे, दाट झाडी, लाल खडक अन डोंगरातील कोरडे पडलेल्या ओढयातील गोल खडबडीत दगडांच्या वाटेने ते सारे चालत राहिले. वासोट्याची शिखरे त्याच्या वाटेवरीस नागेश्‍वर सुळक्‍याच्या काळ्या कभीन्न कड्यातील शंभो शंकराचे पवित्र स्थान. अशा अवघड दुर्गम ठिकाणी जाताना साऱ्यांची दमछाक होत होती पण अवघड ट्रेक बरोबरच महाशिवरात्रीला पुर्ण करण्याच्या इच्छापुर्तीपुढे दमछाकेला कोणी फारसे लक्ष देत नव्हते. सारेजण चढण चढत राहिले. पहिला कडा पार करुन दूसरा करताच सर्वांच्या नजरेस भगवा झेंडा पडला आणि मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष सुरु झाला. हर हर महादेव करीत भाविक नागेश्‍वर मंदिराकडे कूच करीत राहिले.

हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी नागेश्‍वराचे दर्शन घेतले आणि वासोटा मार्गे, चोरवणे मार्गे तसेच दगड गोट्यांच्या ओढ्यातील मार्गातून आपला परतीचा प्रवास पार पाडला. शिवरात्री निमित्त नागेश्‍वरला हजारोंच्या संख्येने भाविक आल्याची नोंद भैरवनाथ बोट क्‍लबने घेत रात्री उशिरापर्यंत त्यांची सेवा कार्यरत ठेवली. त्यांच्या सोबतीला वनविभागाचे पथक होते. सकाळच्या प्रहरीच बामणोलीतून बोटीतून शिवसागर जलाशयाचा प्रवास सुरु केलेल्यांचे चेहरे पुन्हा काठावर आल्यानंतर प्रफुल्लीत दिसत होते. दिवसभराची झालेली दमछाक विसरुन वासोटा, नागेश्‍वरची आठवण मनात साठवत पुन्हा येण्याचा निश्‍चिय केला.

निवेदन
‘सकाळ साप्ताहिक’च्या ‘ट्रेककथा’ सदरासाठी तुमचे अनुभव १०००-१२०० शब्दांमध्ये पाठवा. सोबत रंगीत छायाचित्रे आणि स्वतःचा फोटोही पाठवा. संपर्कासाठी 
पत्ता : संपादक, सकाळ साप्ताहिक, 
५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

अवश्य वाचा : वासोट्याची भव्यता जोडीला अथांग शिवसागर

जरुर वाचा : वासोट्याचा धम्माल नाइट ट्रेक...

सविस्तर वाचा -  ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashivratri Festival Celebreated At Nageshwar Temple Near Vasota Fort