Political News I निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाडी; भाजपला संधी मिळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP-BJP-Shivsena

निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना व राष्ट्रवादीत बिघाडी झाली असल्याने चर्चांना उधाण

निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाडी; भाजपला संधी मिळणार?

आटपाडी : नगरपालिका-नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर खानापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत टेंभूला जादा आठ टीएमसी पाणी मिळाल्यावरून श्रेयवाद रंगला आहे. आघाडीतील बिघाडीचा लाभ उठविण्याची संधी भाजपला मिळाली आहे. नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारसंघांत वेगळी राजकीय समीकरणे तयार होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: 'गृहमंत्र्यांनी भोंग्यांच्या विषयाला 'वळसे' देणं बंद करावं'

‘कोयने’तील आठ टीएमसी जादा पाणी टेंभूला मिळाले. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगला आहे. राष्ट्रवादीचे ॲड. वैभव पाटील यांनी विट्यात पोस्टरबाजी केली. त्या अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडी असताना, खानापूर मतदार संघात शिवसेनेचे आमदार असताना विट्यातील संवाद मेळाव्यात ॲड. पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचा आमदार करण्याची साद घातली होती. साऱ्या घडामोडींचे पडसाद शिवसेनेत उमटलेत.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असताना शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुरू असलेले राजकारण, वक्तव्ये व कुरघोड्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार असल्याचे आमदार बाबर यांनी जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना व राष्ट्रवादीत बिघाडी झाली आहे. त्याचा लाभ घेण्याची संधी भाजपला आयतीच मिळाली. विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना व भाजप यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता असतानाच आघाडीतील बिघाडीमुळे भाजपला नगरपरिषदेसाठी आयताच नवा भिडू मिळू शकतो. एकंदरीत, मतदार संघात महाविकास आघाडीतील बिघाडीचे पडसाद जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेवर उमटणार, हे स्पष्ट आहे.

आटपाडीत राष्ट्रवादीत गटबाजी

आटपाडीत राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. त्यालाही गटबाजीने घेरले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व ॲड. वैभव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झालेत. राज्यात महाविकास आघाडी असून मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. मात्र वैभव पाटील यांनी पक्षाचा झेंडा वापरून स्वतःची गटबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्हा परिषद ‘टार्गेट’ आहे. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शिलेदारांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याची संधी ते देतील, असे वाटत नाही.

हेही वाचा: भोंग्यांबद्दल बोलायला सुपारी दिली जाते; आव्हाडांची बोचरी टीका

Web Title: Mahavikas Aghadi Govt Disputes In Shivsena Nsp Atpadi Sangli Election Period

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top