
-नागेश गायकवाड
आटपाडी : येथील नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी चुरस असेल. उमेदवारी न मिळाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांची बंडखोरी अटळ असेल. नगरपंचायतीवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष अटळ असणार आहे. त्यादृष्टीने डाव टाकायला सुरुवात केली आहे.