Western Maharashtra Mahayuti one-sided victory : पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने एकतर्फी विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. हिंदुत्व आणि सहकारावर आधारित महायुतीचे प्रचार यामुळे या विजयाला धार मिळाली.
सहकार, शिक्षण आणि त्याभोवतीचे राजकारण अशी पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्याची ओळख. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस इथे रुजली, वाढली. महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वाधिक काळ नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राने केले.