
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महायुती एकवटली, इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत एकदिलाचा निर्धार
esakal
Sangli BJP Politics : इस्लामपूर येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक येथील सर्किट हाऊस येथे झाली. महायुती म्हणून एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. शहरातील विकास, नागरिकांचा विश्वास आणि स्थिर प्रशासन या तीन मुद्द्यांवर महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यात आली.