सांगोला नगरपरिषदेत महिलाराज 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 जानेवारी 2020

सांगोला : सांगोला नगरपरिषदेच्या उपनागराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भामाबाई जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा राणी माने यांनी त्यांची निवड घोषित केली. नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव, बांधकाम सभापती सुनीता खडतरे, आरोग्य सभापती छाया मेटकरी तर महिला बालकल्याण सभापती रंजना बनसोडे या महत्त्वाच्या पदांवर महिला असल्याने सांगोला नगरपरिषदेत पुन्हा एकदा महिलाराज आले आहे. 

सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (ता. 14) पार पडली. या निवडी वेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार सुमीत पुसावळे यांच्यासह मुख्याधिकारी कैलास केंद्रे, नगरसेवक सूरज बनसोडे, जुबेर मुजावर, सुरेश माळी, सतीश सावंत, अस्मिर तांबोळी, गजानान बनकर, नगरसेविका रंजना बनसोडे, ज्ञानेश्‍वर तेली, सुनीता खडतरे, स्वाती मगर, शोभा घोंगडे, अनुराधा खडतरे, छाया मेटकरी, अप्सरा ठोकळे, आनंद घोंगडे, अनिल खडतरे, नाथा जाधव, राजू मगर उपस्थित होते. या वेळी नगरपालिका सभागृहात "बाळूमामा' फेम सुमीत पुसावळे यांचा घोंगडी, काठी देऊन सन्मान करण्यात आला. भामाबाई जाधव यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. निवडीनंतर गुलालाची उधळण करण्यात आली. सवाद्य मिरवणुकीने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणुकीत सुमीत पुसावळे सामील झाल्याने शहरातील बघ्यांनी गर्दी केली होती.

महाराष्ट्र

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahilaraj in sangola municipal council