तरुणींनो सावधान.. खात्री करूनच नंबर करा सेव्ह

परशुराम कोकणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

महिलांनी हे क्रमांक करावेत सेव्ह.. 
महिला आणि मुलींनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील 100 आणि 1091 या क्रमांकाशी संपर्क साधावा. या क्रमांकाने आपली तक्रार नोंदवल्यास काहीवेळातच दामिनी पथक आपल्या मदतीला येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर : हैदराबाद येथे झालेल्या निर्भया प्रकरणानंतर सोशल मीडियावरून वेगळ्या प्रकारचे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. यात महिला आणि तरुणींनी सुरक्षेच्या दृष्टीने मेसेजमध्ये दिलेले मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा असे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा नंबर अस्तिवात नाही. महिला व तरुणींनी खात्री केल्याशिवाय कोणताही नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू नये, असे आवाहन साबयर पोलिसांनी केले आहे. 

हेही वाचा : ओ सर...भीक मागत नाही, काम मागतोय..!
 

व्हॉट्‌सऍपवरून होतोय चुकीचा नंबर फॉरवर्ड
व्हॉट्‌सऍपवर मोठ्या प्रमाणावर शेअर होणाऱ्या मोबाईल नंबरबाबत "सकाळ'ने सायबर पोलिसांकडे चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा नंबर अस्तित्वात नाही. शिवाय अशा प्रकारच्या खात्री नसलेला कोणताही मोबाईल क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करू नये. त्यावर एसएमएस किंवा व्हॉट्‌सऍपवर आपली माहिती पाठवू नये. अशाप्रकारच्या अनोळखी मोबाईल क्रमांकावर आपली माहिती पाठवल्यास एखादी सायबर क्राइमची घटना होऊ शकते. त्यामुळे महिला आणि तरुणींनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करताना खात्री करावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. 

हेही वाचा : काय आहे रेडी कोन, ज्यामुळे होताहेत कामगार बेरोजगार

महिलांनी हे क्रमांक करावेत सेव्ह.. 
महिला आणि मुलींनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील 100 आणि 1091 या क्रमांकाशी संपर्क साधावा. या क्रमांकाने आपली तक्रार नोंदवल्यास काहीवेळातच दामिनी पथक आपल्या मदतीला येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make sure you save the number