
मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येण्यासाठी देण्यासाठी केरळ सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.
मिरज (सांगली) : केरळमधील मल्याळी बांधवाना मल्याळम भाषेची माहिती करुन देण्यासाठी केरळ राज्य सरकारने राबविलेल्या मल्याळम मिशन या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच सांगलीमध्ये झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केरळ समाजमचे अध्यक्ष टी.जी. सुरेशकुमार होते. मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येण्यासाठी देण्यासाठी केरळ सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.
येत्या काही दिवसात हा उपक्रम सर्व भाषिकांसाठी खुला केला जाणार आहे. जगातील कानाकोपऱ्यात केरळमधील मल्याळी बांधव उद्योग, व्यवसाय नोकरीसाठी गेले आहेत. अगदी टायरचा पंक्चर काढण्यापासून ते बेकरीसह हॉटेल व्यवसायातही ही मंडळी सक्रिय आहेत. नोकरीनिमीत्तही ही मंडळी विविध ठिकाणी स्थायिक झाली आहे. अनेक वर्षांपासून केरळपासुन दूर झालेल्या या समाजातील स्त्री-पुरुषांचा त्या-त्या ठिकाणच्या इतर भाषिकांशी विवाहही झाले आहेत. यामुळे किंवा दुसऱ्या प्रदेशात राहिल्याने त्यांच्या मुलाबाळांना मल्याळम भाषा केवळ बोलता येते, पण लिहिता वाचता येत नाही.
हेही वाचा - मतदान यंत्रावरील उमेदवार चिन्ह अस्पष्ट असल्याने मतदान करण्यास काहीसा अडथळा निर्माण झाला
मल्याळम भाषा ही अतिषय मृदु आणि नम्र भाषा समजली जाते. मूळचे केरळचे रहिवासी असलेल्या मल्याळी बांधवाना मल्याळम भाषा येणे केरळ सरकारला गरजेचे वाटते आहे. अनेक मल्याळम जोडप्यांनाही मल्याळम भाषा बोलता येते, पण लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अन्य भाषिकांमध्येही मल्याळम भाषेचा प्रचार होण्याच्या उद्देशानेण या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात अन्य भाषिकांनाही यासाठी मल्याळम भाषा शिकण्याची संधी दिली जाणार आहे. या भाषा शिकणाऱ्या स्नातकांना केरळ सरकार विशेष प्रमाणपत्र देणार आहे.
या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी केरळ समाजमचे ज्येष्ठ सभासद पी. एस. प्रभु, पुरषोत्तमन, टी. विजयन, मोहन मुसद यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. मधुकुमार नायर, के. बी. जॉन्सन, श्री सजीवन, लिजीष, गीता सुरेशकुमार, ज्योती नायर, सिम्मी दिलीप, किर्तना करुण, नीता सजीवन, आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक समाजमचे सचिव टी विजयन यांनी केले, तर सुत्रसंचालन मोहन मुसद यांनी केले. आभार सजिवन यांनी मानले.
हेही वाचा - ब्रेकिंग ; धारवाडजवळ झालेल्या टेम्पो - टिप्परच्या भीषण अपघातात अकराजण ठार
संपादन - स्नेहल कदम