
-शरद जाधव
मिरज: ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारताला मुक्ती मिळवून देण्याचे नवभारताचे स्वप्न पाहणाऱ्या क्रांतिकारकांमुळेच स्वातंत्र्य अनुभवत आहोत. मालगाव (ता. मिरज) येथील रामचंद्र कृष्णा सुतार असाच एक तरुण. ब्रिटिशांविरोधात मालगाव परिसरात आंदोलन करताना ब्रिटिशांच्या तावडीत सापडल्यानंतर ‘जिवंत राहिलोच तर मालगावचा हिसका दाखवीन’ असे आव्हान देत हौतात्म्य पत्करलेल्या सुतार यांच्या स्मारकाची मात्र आज दुरवस्था झाली आहे.