माळशिरसच्या बंडखोर झेडपी सदस्यांची सोमवारी सुनावणी 

प्रमोद बोडके
मंगळवार, 14 जानेवारी 2020

संजयमामा शिंदे यांच्या अर्जावरही सुनावणी 
करमाळ्याचे अपक्ष आमदार 2017 मध्ये माढा तालुक्‍यातील कुर्डू जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. भाजप व समविचारीच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढविली होती. अपक्ष असताना राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली कशी? संजयमामा शिंदे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी माळशिरसमधील राष्ट्रवादीचे बंडखोर सदस्य अरुण तोडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. या प्रकरणावर सुनावणी होण्यापूर्वीच आमच्या प्रकरणावर सुनावणी व तत्काळ निकाल कसा? असा प्रश्‍न बंडखोर सदस्यांनी व त्यांच्या वकिलांनी विचारला होता. या प्रकरणावर देखील 20 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले म्हणून माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांना अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (ता. 20) दुपारी एक वाजता ठेवली आहे. 

aschim-maharashtra/mayor-came-streets-early-morning-clean-city-252237">हेही वाचा - महापौर स्वच्छतेसाठी भल्या पहाटे रस्त्यावर 
सोमवारी (ता. 13) झालेल्या सुनावणीत या सदस्यांवर ठेवण्यात आलेल्या दोषारोपावर आज सुनावणीत दावे व प्रतिदावे झाले. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचा दाखला राष्ट्रवादीच्या वकिलांनी आणि बंडखोर सदस्यांच्या वकिलांनी दिला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीच्या निवडीत माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, गणेश पाटील आणि सुनंदा फुले या सहा सदस्यांनी भाजप व समविचारी आघाडीच्या बाजूने मतदान केले. बंडखोर सदस्यांचे वकील ऍड. दत्तात्रेय घोडके म्हणाले, राष्ट्रवादीने या सहा सदस्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे या सदस्यांना आता कोणालाही मतदान करण्याचा अधिकार आहे. आजच्या सुनावणीत आम्ही आमची बाजू मांडली आहे. या प्रकरणाची सुनावणी अद्याप बाकी असल्याने 20 जानेवारी रोजी सुनावणी होईल. 20 जानेवारी रोजी या प्रकरणावर निकाल होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सरतपास, उलटतपास अद्यापही बाकी असल्याचे ऍड. घोडके यांनी सांगितले. 
हेही वाचा - संजयमामांच्या पुतण्याचा सभापती निवडीत पराभव 
या प्रकरणाची आज सुनावणी झाली असून उर्वरित सुनावणीसाठी 20 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. या सुनावणीत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अर्जावरही सुनावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. या बंडखोर सदस्यांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने रणनिती आखली असून कारवाईतून बचाव करण्यासाठी मोहिते-पाटील व भाजप यांनी देखील कायदेशीर लढाई लढविण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malshirash rebel ZP members hearing on Monday