महापौर स्वच्छतेसाठी भल्या पहाटे रस्त्यावर

mayor came to the streets early in the morning for a clean city
mayor came to the streets early in the morning for a clean city

नगर : स्वच्छता सर्वेक्षणात नगर शहराला "थ्री' स्टार मिळवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कंबर कसली आहे. मंगळवारी (दि. 14) भल्या पहाटे शहरात ठिकठिकाणी फिरून दैनंदिन स्वच्छतेच्या कामाची झाडाझडती घेतली. काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. पहिल्या दोन तिमाहीमध्ये नगर देशातील टॉप 100 शहरांमध्ये आले आहे. लवकरच या वर्षीचे अंतिम परीक्षण केंद्रीय समितीतर्फे होईल. त्यात देशातील पहिल्या 50 शहरांत नगरचा समावेश व्हावा, यासाठी महापौर वाकळे प्रयत्नशील आहेत. 

स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नगर शहराला स्वच्छतेत "थ्री' स्टार मिळावा, यासाठी प्रशासनाबरोबरच महापौर वाकळे अतिशय बारकाईने सर्व प्रक्रियेवर लक्ष देऊन आहेत. शहरात सफाई कर्मचाऱ्यांमार्फत दररोज साफसफाई केली जाते. या कामात महापालिकेच्या इतर विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सहभाग घेण्याचे आवाहन महापौर वाकळे यांनी केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी महापालिकेच्या सर्व विभागांचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. महापौर वाकळे यांनी पहाटेपासून शहराच्या विविध भागात फिरत स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. 

स्वच्छतेबाबत पाहणीचे आदेश

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहर कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छतेच्या कामाचा आढावा त्यांनी सोमवारी (दि. 13) दुपारी घेतला होता. त्या वेळी सर्व स्वच्छता निरीक्षकांना प्रभागात फिरून स्वच्छतेबाबत पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

कारवाई करण्याच्याही सूचना

दैनंदिन स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. शहरात रस्त्यावर माती, बांधकाम साहित्य, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच चहाच्या गाड्या, खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर कचरा व घाण पाणी टाकणाऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. या सूचनांप्रमाणे कामकाज सुरू आहे की नाही याची पाहणी महापौर वाकळे यांनी मंगळवारी पहाटेपासूनच केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com