
"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन झाला. दुसरीकडे अनेक गरीब, वाटसरू, रुग्ण, भिकारी, बेघर, निराधारांची दोन वेळच्या जेवणासाठी धडपड सुरू झाली. ही बाब लक्षात येताच जत (जि. सांगली) शहरातील मानवता टीम उपाशी पोटांसाठी धावू लागली.
जत : "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन झाला. दुसरीकडे अनेक गरीब, वाटसरू, रुग्ण, भिकारी, बेघर, निराधारांची दोन वेळच्या जेवणासाठी धडपड सुरू झाली. ही बाब लक्षात येताच जत शहरातील मानवता टीम उपाशी पोटांसाठी धावू लागली. काही मित्रांच्या डोक्यातील संकल्पना आता जत शहरासह तालुक्यातील अनेक समाजांना साद घालत आहे. अनेक स्तरावर या लोकांना रोज दोन वेळच्या जेवणाची सोय झाली.
"कोरोना' महामारीचे भयंकर संकट ओढवले आहे. देशाच्या नागरिकांनी तोंड देत आहेत. मात्र, घराचा आसरा व कुटुंबाचा सहारा असणाऱ्या लोकांव्यतिरिक्त गरीब, वाटसरू, भिकारी, बेघर, निराधाराची संख्या जत शहरात मोठी आहे.
दरम्यान, सर्वत्र हॉटेल बंद, कोरोनाच्या भितीने घरोघरी भीक मागणे कठीण झालेल्या या गरिबांना कोरोना विषाणूंच्या संसर्गाअगोदर उपाशी पोट कसे भरायचे याची भिती जाणवू लागली. या पार्श्वभूमीवर जत शहरातील मानवता टीमचे किरण जाधव, सोमनिंग कोळी, जतचे मंडल अधिकारी संदीप मोरे, तलाठी रविंद्र घाडगे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक रावसाहेब पवार, साई ड्रेसेसचे मालक खंडप्पा कुमठेकर, सामाजिक कार्यकर्ते राम संकपाळ, सुधाकर जाधव यांनी या संकट काळात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक गरीब, वाटसरू, रुग्ण, भिकारी, बेघर, निराधारांना अन्न, शिधा, देवून मदतीचा आधार दिला.
मानवता धर्माचे पालन
आज लॉक डाऊनमुळे अखंड जनजीवनच विस्कळीत झाले. अशा काळातही जीव धोक्यात घालून आरोग्य विभाग, पोलिस, महसूल प्रशासन, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, सफाई कामगार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाती लोक, सामाजिक कार्यकर्ते, एन.जी.ओ मदतीचा हात देवून मानवता धर्म पाळत आहेत.