मंगळवेढा अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे

गुरूदेव स्वामी
बुधवार, 5 डिसेंबर 2018

भोसे - मंगळवेढा तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त असल्याने अंगणवाडी विभागाचा कारभार रामभरोसे झाला आहे. कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नाही, तालुक्यातील सेविका मदतनीस यांच्या मागण्याकडे लक्ष देण्यास गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव चालढकल करीत आहेत. दोन वर्षापुर्वी तीन महिला कर्मचाऱ्यांचे निधन होऊन देखील त्यांचे कुटुंबास सेवानिवृत्त रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या अंगवाडी शिक्षकांच्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मंगळवेढा पंचायत समितीवर मोर्चा काढू असा इशारा सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षा पार्वती स्वामी यांनी दिला आहे.

तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षीची भाऊबीज अद्याप मिळाली नाही. इतर तालुक्यांमध्ये साड्यांसाठी आठशे रुपये अनुदान मिळाले असताना मंगळवेढा तालुक्यात मात्र साडेचारशे रुपये अनुदान दिले आहे. बाकीच्या तालुक्यात दोन हजार रुपये सादिल अनुदान जमा झाले. परंतु, तालुक्यात मात्र जमा झाले नाही, तेरा अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त होऊन अनेक महिने झाले तरी त्यांना अजून निवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्यावर भीक मागण्याची पाळी आली आहे. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र जाधव आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून, त्वरित आमच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पार्वती स्वामी यांनी दिला आहे.    

तालुक्यातील नंदा सूर्यवंशी मदतनीस सूर्यवंशीवाडी; सुरेखा आठवले मदतनीस हुलजंती; वहिदा नदाफ सेविका कर्जाळ; या तिघीचे आजाराने व अपघाताने निधन होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांचे कुटुंबास अद्याप सेवानिवृत्तिच्या लाभाची रक्कम मिळाली नाही.

माझ्या भावाची पत्नी नंदा सुर्यवंशी हिचे दोन वर्षापुर्वी निधन झाले तरीदेखील अद्याप आमचे कुटुंबास सेवानिव्रुतिच्या लाभाची रक्कम मिळाली नाही चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात -दत्तात्रय सुर्यवंशी हुन्नुर

Web Title: mangalwedha Anganwadi Department's administration is not good