Ice ball creates one foot deep crater
esakal
मांगले : येथील मोरणा नदीकाठच्या परिसरात काल सकाळी साडेआठच्या सुमारास थरारक घटना घडली. समीर कुलकर्णी यांच्या उसाच्या शेतात आकाशातून सुमारे सात ते आठ किलो वजनाचा बर्फाचा मोठा खडा (मेगाक्रायोमेटिओर) कोसळला. खडा वेगाने शेतातील ओलसर काळ्या मातीत पडून तब्बल एक फूट खोल खड्डा पडला आहे. गावापासून एक किलोमीटरवर बर्फाचा गोळा (Megacryometeor incident near Morna River) पडला. गावापासून दूर तो पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. आज सकाळी घडलेल्या प्रकाराबद्दल तर्क-वितर्क लढवले जात आहेत.