esakal | 'यळकोट यळकोट' या जयघोषात मंगसुळी खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

'यळकोट यळकोट' या जयघोषात  मंगसुळी खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले

'यळकोट यळकोट' या जयघोषात मंगसुळी खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उगार खुर्द (बेळगाव) : कोरोनाचा संसर्ग (Covid 19) कमी झाल्याने निर्बंध उठविण्याची घोषणा राज्य सरकारने शनिवारी केली. त्यामुळे सोमवारी (ता. ५) सकाळी 'यळकोट यळकोट' या जयघोषात खंडोबाच्या बारा देवस्थानांपैकी एक असलेल्या मंगसुळी येथील पुरातन प्रसिद्ध मंदिर खंडोबाचे मंदिर उघडले.

सकाळी एपीएमसी सदस्य रवींद्र पुजारी यांनी महाव्दाराच्या उंबरठ्याची व दरवाजाची पूजा केली. यावेळी श्रीकांत पुजारी, अप्पासाहेब पुजारी यांच्यासह वाघे, मुरळ्या व भाविक उपस्थित होते. पूजा झाल्यावर महाव्दार उघडले. कोरोना संसर्ग सुरु झाल्याने हे मंदिर १८ एप्रिलपासून ७८ दिवस बंद होते.

हेही वाचा- मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्यावर कारवाई

मंदिर उघडल्याने परिसरातील भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र भाविकांना शासनाने घालून दिलेल्या मास्क, सॅनिटायझर वापर व सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

loading image