Manoj Jarange Patil Maratha reservation demand
esakal
आटपाडी (जि. सांगली) : ‘‘औंध, सातारा, कोल्हापूर संस्थान व बॉम्बे आणि पुणे गॅझेट लागू करा, अन्यथा परिणाम भोगावे (Manoj Jarange Patil Maratha reservation demand) लागतील,’’ असा आक्रमक इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे आयोजित सभेत दिला. समाजाच्या संबंधित विविध मागण्यांसाठी जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून उपोषण करणार आहेत.