

Manoj Jarange Patil Convoy Accident in Sangli; 3 Vehicles Collide, Worker Injured
esakal
Manoj Jarange Patil: सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना आंबेगाव परिसरात त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. याचवेळी ताफ्यातील दोन ते तीन वाहनांची एकमेकांना धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या एसटी बसने ताफ्यातील एका वाहनाला धडक दिल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेत एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.