सहकाऱ्याच्या विरहाने मंत्री जयंत पाटील गहिवरले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रमात आज मंत्री जयंत पाटील हे भावूक झाले.

हेही वाचा - मिरज स्थानकाबाहेरील सांडपाणी हटेना; प्रवासी हैराण -

जवळच्या सहकाऱ्याचे अकाली निधन झाल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला मार्गदर्शन करणारी लोकं जेव्हा अकाली निघून जातात तेव्हा खूप दुःख होती अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

हेही वाचा - Navratri Special  : कोरोना काळात ‘त्या’ बनल्या संकटमोचक -

कोरोनामुळे जगभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जाणत्या लोकांचा या काळात मृत्यू झाला.

कोरोनाचं संकट काळात तसेच जबाबदार सहकाऱ्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेवटी श्रद्धांजली वाहून त्यांनी कातरलेल्या स्वरात बोलणं संपवले. त्यावेळी उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mantri jayant patil emotional on the dead of rajarambapu sahakari karkhana chair person jayant patil in sangli