#MarathaKrantiMorcha आरक्षण मिळणार का? होय म्हणतोय, होय म्हणतोय...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का?
नाही म्हणतोय नाही म्हणतो...
मराठ्यांना आरक्षण मिळणार का? 
होय म्हणतोय होय म्हणतोय...
सत्तेतील मंत्री सुधारणार का? 
नाही म्हणतोय नाही म्हणतोय....
असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात त्याचे आयोजन केले होते.

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का?
नाही म्हणतोय नाही म्हणतो...
मराठ्यांना आरक्षण मिळणार का? 
होय म्हणतोय होय म्हणतोय...
सत्तेतील मंत्री सुधारणार का? 
नाही म्हणतोय नाही म्हणतोय....
असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात त्याचे आयोजन केले होते.

समाजातर्फे अकराव्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. 
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत आंदोलनाच्या अकराव्या दिवशीही मराठा बांधव सकाळपासून पाठिंब्यासाठी येत होते. दुपारी बाराच्या सुमारास माजनाळ (ता. पन्हाळा) येथील ‘मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज की जय..., या सरकारचे करायचे काय. खाली डोके वर पाय...’,
 ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे..’, अशा घोषणा देत चौकात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, ज्ञानेश्‍वर या वेशभूषेत मुलेही आली होती. त्यांनी सकल मराठा समाजाकडे पाठिंब्याचे निवेदन दिले. साडेबारानंतर युवराज गंगावणे आपल्या नंदीबैलासह चौकात आले. त्यांचे आगमन होताच ‘एक मराठा, लाख मराठा..’ अशा घोषणा देण्यात आल्या.

त्यानंतर नंदीबैलाला उपरोधिकपणे सरकारची उपमा देऊन काही प्रश्‍न विचारण्यात आले. सरकार आंदोलन फोडत आहे काय, मागासवर्गीय आयोग खरंच काम करतोय काय, आत्महत्या केलेल्या बंधू-भगिनींना न्याय मिळणार काय, असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारण्यात आले. यातील काही प्रश्‍नांवर नंदीबैलाने होकार व नकारार्थी मान डोलावली. हे आंदोलन आज चर्चेचा विषय ठरले. 

कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्‍टर्स असोसिएशन, कोल्हापूर युवा पत्रकार संघ, यशवंत मंच (कुंभी-कासारी), ग्रामपंचायत ढोलगरवाडी (ता. चंदगड), रावणेश्‍वर महादेव भक्त मंडळ, मुस्लिम सुन्नत जमीयत (हुपरी), दि कोल्हापूर ग्रेन कॅन्वसिंग एजंट असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघ, ग्रामपंचायत शेंडूर (ता. कागल), ग्रामपंचायत माळवाडी (पन्हाळा), मराठा क्रांती मोर्चा (हातकणंगले), माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशन (लक्ष्मीपुरी), राजमाता जिजाऊ ब्रिगेडने आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, रावणेश्‍वर महादेव भक्त मंडळातर्फे सोमवारी (ता. ६) मराठा आरक्षणासाठी रावणेश्‍वर महादेवाला साकडे घालण्यात येणार आहे. 

आंदोलकांना अल्पोपहार 
मुस्लिम समाजातर्फे आंदोलकांना रोजच्या जेवणाची सोय केली आहे. एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशनने आंदोलनास पाठिंबा देत आज आंदोलकांना अल्पोपहार दिला. या वेळी भरत कुडित्रेकर, प्रभाकर कांबळे, अशोक भास्कर, धोंडिराम कांबळे, प्रा. डॉ. अतुल कांबळे, सतीश कुरणे, योगेश डिगे, राजू नाईक, कैलास शिंगे, महादेव कांबळे, योगेश माजगावकर उपस्थित होते. 

ब्राह्मण मंचतर्फे दुचाकी फेरी 
ब्राह्मण युवा मंचतर्फे आज (ता. ५) दुचाकी फेरी काढून मराठा ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येईल. निवृत्ती चौक येथून सकाळी साडेनऊ वाजता त्यास सुरवात होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha agitation in Dasara Chouk