सांगलीकरहो सलाम...! 

बलराज पवार : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

सांगली - मराठा क्रांती मोर्चा आज सांगलीत पार पडला... जिल्ह्याच्या इतिहासातील एक अविश्‍वसनीय असा हा मोर्चा होता.. गर्दीचा उच्चांक "न भूतो... न भविष्यती' असा होता. संयोजकांच्या दाव्यानुसार तब्बल 21 लाखांचा...ना कोणत्या नेत्याचे भाषण ऐकायचे होते... ना कोणा हिरो-हिरॉईनला बघायचे होते. तरीही एक समाज म्हणून एकत्र आलेल्या मराठा वादळाने अभूतपूर्व इतिहास घडवला... 

सांगलीच्या या मोर्चाचे संयोजक कोण माहिती नाही... कोणा एकाचे नाव घ्यायचे नाही...सगळेच नेते होते... सर्वच नेतृत्व करत होते... फक्त सर्वांनी एकत्रितपणे समाजाला हाक दिली आणि आज हा इतिहास घडला...

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक उत्स्फूर्तपणे मोर्चासाठी आले. गावागावांतून लोकांनीच स्वत: गाड्या ठरवून गावकऱ्यांना सोबत आणले. सर्वजण सांगलीत मोर्चा मार्गापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र सांगलीच्या दिशेने सगळेच झेपावले होते. 

आयर्विन पुलाच्या मागे...कर्नाळ रोडवर नांद्रेच्या दिशेने...तासगाव रोडवर बुधगाव, माधवनगरपर्यंत...तानंग फाट्यापर्यंत...मिशन हॉस्पिटलच्या मागे.... कोल्हापूर रोडवर उदगावपर्यंत, ही झाली बाहेरची गर्दी; शिवाय शहरात गल्लीबोळातून झालेली गर्दी.. सर्व प्रमुख मार्गही गर्दीने फुललेले...  कशासाठी आले होते इतक्‍या संख्येने सांगलीकर... केवळ एक दबलेल्या आवाजाला तोंड फोडण्यासाठी...अनेक वर्ष दाबून राहिलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी...  संयोजन समितीने आवाहन केल्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी आचारसंहितेचे पालन केले. कोणताही गोंधळ नाही, गोंगाट नाही, मूक मोर्चा... निषेध मोर्चा असल्याचे भान ठेवून सर्वजण सहभागी झाले होते.

आबालवृद्ध मोर्चात सहभागी झाले होते. ध्वनिक्षेपकावरून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करीत ते मोर्चात सहभागी झाले...  समारोपाच्या कार्यक्रमात पूजा पाटील, अश्‍विनी धनवडे आणि स्नेहल पाटील यांनी मराठा समाजाच्या मनातील भावनाच जणू बोलून दाखवल्या... समाजाचे आजचे वास्तव त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. मोर्चा
संपल्यानंतर स्वयंसेवकांनी तातडीने शहर स्वच्छ केले. नागरिक शांततेने सांगलीतून बाहेर गेले. महापालिकेनेही या मोर्चासाठी तातडीने व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांचेही कौतुक करावे लागेल. एक अविश्‍वसनीय अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी कायम झाला होता. मनाच्या एका कप्प्यात ही स्मृती आता जतन झाली आहे. 

कोणतीही इव्हेंट कंपनी याच्या मागे नाही; पण त्यांनाही लाजवेल असे नियोजन या मोर्चाचे झाले. त्याचे खरे हीरो ठरले ते सांगलीकरच...म्हणूनच सांगलीकरहो...सलाम...! 

Web Title: Maratha Kranti Morcha in sangli