छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी सकल मराठा समाज रस्त्यावर

मिलिंद देसाई
Sunday, 30 August 2020

खडेबाजार पोलीस स्टेशन ते पोलीस आयुक्त कार्यालयपर्यंत मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या समाज कंटकाला अटक करा अशी मागणी करीत रविवारी सकाळी सखल मराठा समाज रस्तावर उतरला. तसेच खडेबाजार पोलीस स्टेशन ते पोलीस आयुक्त कार्यालयपर्यंत मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटकातील काही कन्नड संघटना जाणीवपूर्वक सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी मराजांचा अपमान करीत आहेत. याच्या विरोधात सखल मराठा समाजाच्यावतीने रविवारी सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा -  त्यामुळे मुख्यमंत्र्यांची देवावर श्रद्धा कमी...

त्यानंतर मोर्चाला सुरवात झाली. मणगुत्ती येथे बसविण्यात आलेला शिवाजी मराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी काढण्यात आला होता. त्याबद्दल संताप व्यक्त होत असतानाच पुन्हा एकदा पिरणवाडी येथे ग्रामस्थांचा विरोध डावलून क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांनतर जाणीवपूर्वक कन्नड संघटना शिवाजी महाराजांचा अवमान करीत आहेत.

हेही वाचा -  तरुणाईच्या निर्धाराने उभारले पाच दिवसांत कोविड सेंटर...

याच्या निषेधार्थ हजारो लोकांनी मोर्चात सहभाग घेतला यावेळी सखल मराठा समाजाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे यांनी ज्या लोकांनी अवमान केला आहे. त्यांच्यावर संध्याकाळी पर्यंत कारवाई न झाल्यास मराठा समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावेळी पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी सकाळपासून 2 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. तरीही जाणीवपूर्वक राजांचा अवमान केला जात असल्याने मराठी भाषिकांत मात्र तीव्र संताप आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha minority protest against insult of shivaji maharaj idol in belgaum