#MarathaKrantiMorcha बंद, रास्ता रोको, निषेध फेऱ्यांमुळे सांगली जिल्ह्यात परस्थिती तणावाची 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

सांगली - मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठोक मोर्चे सुरु झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज आष्टा, इस्लामपूर, तासगाव, येडेनिपाणी, कवठेमहांकाळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. सांगलीत महापालिका क्षेत्रात मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही आंदोलन झाले. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. जिल्ह्यात बंद, रास्ता रोको, निषेध फेऱ्यांमुळे वातावरण तणावाचे आहे. ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन भूमिका मांडण्यात आली. 

आरक्षणासाठी जुने कायगाव येथील काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येचे पडसाद आज जिल्ह्यात उमटले. तासगाव, कवठेमहांकाळ, विटा, खानापूर, येडेनिपाणी, वाघोली आदी ठिकाणी मराठा क्रांतीचे कार्यकर्ते रास्ता रोको, धरणे, निषेध फेऱ्या काढण्यात आल्या. मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ तहसिलदारांना निवेदन दिले. वाघोली येथे टायर पेटवून शासनाचा निषेध करण्यात आला. विटा, तासगाव शहर बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे संपूर्ण जिल्ह्यात बैठका सुरु आहेत. कोणत्याही वेळी आंदोलनाची तयारी सुरु आहे. समाजाला तातडीने आरक्षण मिळाले, आरक्षण मिळेपर्यंत आगामी नोकरभरती थांबवावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, ऍट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, महामंडळांतर्गत कर्ज देण्यासाठी बॅंकांना सक्ती करावी अशा मागण्या आहेत. मात्र सोमवारच्या तरुणांच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा औरंगाबाद येथे एका युवकांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे वातावरण तापले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha band, rastaroko in sangli