राष्ट्रवादी काँग्रेसचा 12 ला नागपूरला हल्लाबोल मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 डिसेंबर 2017

कागल : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही कर्जमाफीची रक्‍कम बॅंकेत जमा केलेली नाही. ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे. कर्जमाफीची रक्‍कम तत्काळ शेतकऱ्यांना द्यावी व सातबारा कोरा करावा,' अशी आमची मागणी आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे गुलाब नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली 12 डिसेंबर रोजी विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढून 'भाजप सरकार चले जाव' चा नारा देणार आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुश्रीफ म्हणाले, ''विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूला होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीबाबत 19 हजार कोटी बॅंक खात्यावर वर्ग केल्याचे सत्ताधारी सांगत आहेत, मात्र अद्यापही रक्‍कम जमा नाही. विधानसभेचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा देताच बॅंक खात्यावर रक्‍कम जमा करण्यासाठी शासनाच्या हालचाली सुरू झाल्या. गेले दोन दिवस बॅंकेचे कामकाज रात्रंदिवस सुरू ठेवण्याचे सांगितले; परंतु अद्याप या रकमेचा पत्ताच नाही.'' 

मुश्रीफ म्हणाले, ''1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीची कर्जमाफी होती. ही 1 ऑक्‍टोबर 2016 ते 30 सप्टेंबर 2017 अशी मान्य केली. खावटी कर्ज, 2012 पूर्वीचे अपात्र कर्ज पुनर्घटन झाले. यात सहकार आयुक्‍तांची परवानगी शासनाने घ्यायला हवी होती, ती घेतली नाही. याबाबत नागपूर अधिवेशनात आवाज उठविणार. तसेच पती-पत्नीच्या कर्जात एकालाच लाभ मिळणार होता, परंतु दीड लाख कर्ज असेल, तर त्याचा लाभ दोघांनाही मिळावा, आयकर भरणारे वगळता पदाधिकारी, नोकर वर्ग ही मंडळी श्रीमंत नाहीत. त्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे.'' 

मुश्रीफ म्हणाले, ''वर्धा व सेवाग्राम येथे हल्लाबोल दिंडी झाली. आता नागपूरच्या विधान भवनावर 12 रोजी रॅलीने हल्लाबोल दिंडी काढण्यात येईल.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Kolhapur News Vidhan Sabha NCP