अन्न प्रक्रिया उद्योगातील सब कुछ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

सातारा - प्रक्रिया उद्योग व शीतगृहांअभावी नाशवंत शेतीमालाची होणारी नासाडी कमी करण्यासाठी बीव्हीजी इंडिया या कंपनीने देगाव येथे मेगा फूड पार्क सुरू केला आहे. या पार्कमधून कन्सेप्टपासून कमिशनिंगपर्यंतची सर्व सेवा उपलब्ध केली जाणार आहे. 64 एकरांवर उभारला गेलेल्या या पार्कमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उद्योजकांना ठराविक दराने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

सातारा - प्रक्रिया उद्योग व शीतगृहांअभावी नाशवंत शेतीमालाची होणारी नासाडी कमी करण्यासाठी बीव्हीजी इंडिया या कंपनीने देगाव येथे मेगा फूड पार्क सुरू केला आहे. या पार्कमधून कन्सेप्टपासून कमिशनिंगपर्यंतची सर्व सेवा उपलब्ध केली जाणार आहे. 64 एकरांवर उभारला गेलेल्या या पार्कमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उद्योजकांना ठराविक दराने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

देगाव (ता. सातारा) येथे बीव्हीजी इंडियाच्या वतीने मेगा फूड पार्क हा प्रकल्प 64 एकर क्षेत्रावर उभारण्यात आला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा ठराविक दराने गरजेनुसार तेथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामध्ये गोडाऊन, वेअरहाऊस, पल्पिंग लाइन, रायपनिंग चेंबर, शीतगृह, क्वालिटी कंट्रोल, पॅक हाऊस, वजन काटा, विद्युत उपकेंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्प, प्रशिक्षण केंद्र आदींचा समावेश आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या मागील दशकात दुपटीने वाढली आहे. ही संधी साधण्यासाठी बीव्हीजी इंडियाने मेगा फूड पार्कच्या माध्यमातून देगाव येथे बीव्हीजी हेल्थ फुड प्रायव्हेट लिमिटेड, बीव्हीजी जल या कंपन्या स्थापन केल्या आहेत. तेथे पल्प, जाम व इतर फळांची उत्पादने, मसाले, धान्य बाजारपेठेत आणले जाणार आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पुरविण्याचे लक्ष ठेवले आहे. "फ्रेश टीन' या ब्रॅंडखाली विविध फळांचे पल्प, "ब्रेकी' या ब्रॅंडखाली विविध फळांचे जॅम, "अभिरुची' या नावाने मसाले आणि "महाग्रेन' या नावाने यांत्रिक पद्धतीने स्वच्छ केलेली धान्ये बाजारापेठेत विक्रीस येणार आहे. या पार्कमध्ये उद्योग चालू करणाऱ्या उद्योजकांना अन्नप्रक्रिया मंत्रालयाकडून "किसान संपदा' योजनेसारख्या अनेक योजनांत विशेष लाभ मिळण्याची संधी आहे. हा मेगा पार्क मुंबई आणि जयगड बंदराच्या आणि पुणे- मुंबई- गोवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्याने येथून उत्पादित अन्नपदार्थांची निर्यात करणे सोपे होणार आहे. 

केंद्रीय मंत्र्यासह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 
या मेगा पार्कचे उद्‌घाटन उद्या (ता. 1) दुपारी अडीच वाजता केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साधवी निरंजन ज्योती, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news megafruit satara