नगर - पारनेरमधील शाळा मोजत आहे अखेरची घटका

मार्तंडराव बुचुडे
गुरुवार, 15 मार्च 2018

पारनेर (नगर) : शहरातील पहिली ते चौथीच्या मुली व उद्याच्या सावित्रीबाई आणि जिजाऊ गेली आठ महिन्यापासून बाजारतळावरील डॅा. बाबासाहेब आंबेडकर भवनात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या गोरगरीबांच्या मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सरकारी अधिकाऱ्यासह कोणासही वेळ नाही. या पारनेरमधील मुलींच्या शाळेत 74 मुली शिक्षण घेत आहेत.     

पारनेर (नगर) : शहरातील पहिली ते चौथीच्या मुली व उद्याच्या सावित्रीबाई आणि जिजाऊ गेली आठ महिन्यापासून बाजारतळावरील डॅा. बाबासाहेब आंबेडकर भवनात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या गोरगरीबांच्या मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास सरकारी अधिकाऱ्यासह कोणासही वेळ नाही. या पारनेरमधील मुलींच्या शाळेत 74 मुली शिक्षण घेत आहेत.     

पारनेरमध्ये जिल्हापरीषदेची मुलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळी शाळा आहे. येथील मुलींची शाळा सन 1912 साली म्हणजे सुमारे 105 वर्षापुर्वीची आहे. त्या ठिकाणी आठ खोल्या आहेत मात्र या आठही खोल्या अखेरची घटका मोजत आहेत. ही सर्वच इमारत अता अतीशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मुलींना बसविणे धोक्याचे असल्याने या शैक्षमिक वर्षाच्या सुरूवाती पासूनच गेली आठ महिन्यापासून या मुली बाजारतळावरील एका सांस्कृतिक भवनात तीन वर्ग व एक वर्ग एका खाजगी खोलीत भरत आहेत.     

बाजार तळवरील समाज मंदीरात एकाच ठिकाणी तीन वर्ग एकत्रित भरविले जात आहेत. या ठिकाणी शिक्षकांना शिकवताना आवाज इतका घुमतो की, मुलांना शिक्षिका काय बोलतात हे सुद्धा समजून येत नाही. मात्र गरीबा घरची या मुलं काहीही तक्रार नकरता हे सर्व सहन करत आहेत. या ठिकाणी शिकणाऱ्या सर्व मुली गरीबा घरच्या आहेत. ज्या मुलींना महागडे खाजगी शाळेतील किंवा इंग्रजी माध्यामाचे शिक्षण घेणे परवडणार नाही अशाच मुली येथे शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र यांना होणारा त्रास ना सकारी आधिकाऱ्यांच्या लक्षात येत ना नेते मंडळीच्या लक्षात येत.     

केवळ शिक्षणाची जिद्द व आईवडीलांची इच्छा म्हणून या मुली जिद्दीने अशाही कठीण व अडचणीच्या अवस्थेत शिकत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी मोठमोठी लाखो रूपये खर्च करून देवदेवतांची मंदीरे उभारली आहेत. दरवर्षी या ठिकाणी लाखो रूपये खर्च करूण यात्रा भरविल्या जातात. या यात्रा जत्रांवर लाखो रूपये खर्च होतो मात्र पारनेर सारख्या पुरोगामी विचाराच्या तालुक्यातही शिक्षणाच्या मंदीरांची अवस्था मात्र अतिशय दयनीय झाली आहे.

अनेक गावातील शाळा खोल्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील मुले सध्या गावोगावातील मंदिरात किंवा समाजमंदिरात नाहीतर खाजीगी घरांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. गेली अनेक वर्ष शाळा खोल्या बांधकाम किंवा दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने असा परिणाम झाला आहे. कारण शिक्षण हा विषय फारसा कोणीही गंभीरतेने घेत नाही. त्या मुळे तालुक्यातील शिक्षमाची अशी परवड सुरू आहे.   

पारनेर शहरातील मुलींच्या शाळेच्या खोल्यांसाठीची मागणी प्रस्ताव 29 सप्टेंबर 2017 ला जिल्हा परीषदेकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याआपही जिल्हा परीषदेने त्या प्रस्तावाला मंजूरी दिली नाही. पारनेर पंचायत समिती व शिक्षण विभागाला अद्यापही मंजुरी बाबत तसे कळविले नाही.     

आम्ही पारनेर तालुक्यातील शाळाचा सर्वे केला आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध गावात 129 शाळा खोल्यांची गरज आहे तशी मागणी जिल्हा परीषदेकडे केली आहे. ळदरा, गांजेवाडी व जवळा येथील शाळा खोल्यांना मान्यता आली आहे. मात्र पारनेरच्या मुलींच्या शाळा खोल्याचा प्रस्तावास अध्याप मान्यता नाही ती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे गट शिक्षणाधिकारी संभाजी झावरे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news nagar news bad condition of girls school