जिल्ह्याचे विभाजन करताना तिसगाव तालुक्याची निर्मिती करावी - भाऊसाहेब लवांडे

सुनील अकोलकर
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

तिसगाव (नगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना तिसगाव या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी तिसगाव येथील युवानेते भाऊसाहेब लवांडे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून दक्षिण अहमदनगर आणि उत्तर अहमदनगर असे दोन जिल्हे करण्याचे प्रस्तावित आहेत. श्रीरामपूर येथील कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या जिल्ह्याबरोबर तालुका निर्मितीसाठी सरकार अनुकूल असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात सध्या तिसगाव, सोनई आणि काष्टी हे नवीन तालुके अस्तित्वात येऊ शकतील.

तिसगाव नवीन तालुका झाल्यास तिसगावसह मिरी आणि करंजी या महसुली मंडळाचा समावेश केल्यास लोकांची मोठी सोय होईल. येथील बाजारपेठेचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. आसपासच्या तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक गावाचा या बाजारपेठेशी नियमित संबंध येतो. त्यामुळे तालुक्याच्या दर्जाचे गाव म्हणून तिसगाकडे पाहिले जाते. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिसगाव येथून लवकरच पुणे, जालना, बुलडाणा, नागपूर असा महामार्ग देखील प्रस्तावित आहे . त्यामुळे येथील बाजारपेठ देखील आणखी वाढणार आहे.

कांदा मार्केट तसेच दुग्ध व्यवसाय भरभराटीस आल्याने या बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. वास्तव्याच्या दृष्टीने हे गाव सोयीचे ठरत असल्याने गावाचा विस्तार उपनगरांनी वाढत चालला आहे. झपाट्याने वाढत चाललेल्या या गावाला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास तिसगावसह हा भागातील जनतेला प्रशासकीय सुविधा मिळणे सोयीचे ठरेल. तालुका मुख्यालय झाल्यास दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर होईल. शिवाय मढी, वृद्धेश्वर, मायंबा या देवस्थानाच्या जवळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले गाव सर्वांना सोयीचे आहे. तिसगाव या नवीन तालुक्याची निर्मिती झाल्यास गावाचा चेहरामोहरा बदलून जाईल असे मत भाऊसाहेब लवांडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Marathi news nagar news tisgao taluka