पाण्याच्या पाईपलाईनमधून आले दोन मृत उंदीर बाहेर

water
water
Updated on

तारळे (ता. पाटण, जि. सातारा) : तारळे ग्रामपंचायतीतंर्गत धनगरवाडी येथे काल (मंगळवाी) पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून दोन मृत उंदीर निघाले. त्यामुळे खळबळ उडाली. येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दोन महिन्यात होत असलेल्या अशा घटनांमुळे वाडीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकारी व प्रशासन कारभारावर ग्रामस्थ असमाधानी असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तारळेपासून सुमारे दीड किमी वर धनगरवाडी आहे. गत काही दिवसांपासून वाडीत पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत होता. नागरिकांनी तक्रारी केल्यावर पाइपमध्ये काही अडथळा आहे का हे पाहण्यासाठी पाईप मध्येच कापून पाण्याचा प्रवाह सोडला असता, दोन मृत उंदीर बाहेर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला गत दोन महिन्यातील अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्याविरुद्ध ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.  

याबाबत ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले गावातील खातेदारांच्या नळाला तोट्या नसल्याने हे उंदीर त्याद्वारे पाइपमध्ये जात असावेत, कारण पाईपलाईन कुठेही लिकेज नाही, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही याचीही खबरदारी घेत आहोत त्याचबरोबर ज्यांच्या नळांना तोट्या नाहीत अशांचा पाणीपुरवठा बंद करण्याचीही कारवाई करण्यात येईल. मात्र दोन महिन्यात दोन ते तीन वेळा झालेल्या आशा घटनांमुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अधिक सजगपणे याकडे लक्ष देण्याची गरज ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com