कोयना धरणग्रस्तांचा ठिय्या आंदोलनास प्रारंभ

जालींदर सत्रे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कोयनानगर येथील शिवाजी क्रिडांगणावर श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आंदोलनात संपत देसाई, डी. के. बोडके, हरिश्चंद्र दळवी गुरुजी, रमेश जाधव, संभाजी चाळके, सत्यजित शेलार, बळीराम कदम यांच्यासह पाच हजार प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. 

पाटण (जि. सातारा) : कोयना धरणग्रस्त ६४ वर्षे खितपत पडले आहेत. प्रकल्पग्रस्तांना सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन न्याय मिळावा अशी अपेक्षा होती. मात्र झापड बांधलेले सरकार जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सरकारला जाग यावी, यासाठी कोयना धरणग्रस्तांनी आज ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. चार दिवसात आंदोलनस्थळी येवून मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले नाही तर सर्व प्रकल्पग्रस्त चालत मुंबईला जाऊन मंत्रालयावर मोर्चा काढतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. 

कोयनानगर येथील शिवाजी क्रिडांगणावर श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आंदोलनात संपत देसाई, डी. के. बोडके, हरिश्चंद्र दळवी गुरुजी, रमेश जाधव, संभाजी चाळके, सत्यजित शेलार, बळीराम कदम यांच्यासह पाच हजार प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. 

डॉ. पाटणकर म्हणाले, प्रकल्पाला ६४ वर्षे झाली, जमीन व नागरी सुविधापासुन प्रकल्पग्रस्त वंचित आहेत ही खेदाची बाब आहे. २० हजारावर खातेदार वंचित आहेत. प्रकल्पग्रस्तांची तिसरी पिढी जागृत झाल्याने शासनाला ते भारी पडेल. शांतता व सयमाच्या माध्यमातुन आंदोलन सुरु झाले आहे. चार दिवसात मुख्यमंत्रीजर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी कोयनानगरला नाही आले तर आंदोलनास जमलेले प्रकल्पग्रस्त पायी मुंबईला व प्रकल्पग्रस्तांचे मुंबईयेथील नातेवाईक आझाद मैदानावर आंदोलनास येतील. मुंबईला प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक लावावी, मागण्यांवर लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावे व मंत्रालयाबरोबर सातारा जिल्हाधिकारी कार्यलयात कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी वॉर रुम करावी अशा मागणीसाठी आंदोलन असुन कोयना धरणानंतर झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला मात्र आम्हाला का नाही प्रकल्पग्रस्तांच्या तिसऱ्यापिढीची भावना शासनास जड जाईल. प्रारंभी तीन देऊळ परिसरात प्रकल्पग्रस्त एकत्र आल्यानंतर आंदोलनाची सुरवात डॉ. पाटणकर यांच्याहस्ते मशाल पेटवून झाली. त्यानंतर प्रकल्पग्रस्त कोयना पोलिस ठाणे, प्रकल्पाच्या कार्यालय परिसरातुन प्रकल्पग्रस्तांची रॅली बाजार तळाजवळील शिवाजी क्रिडांगणावर दाखल झाली. तेथे ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. कोयनानगरला आत्तापर्यंत प्रकल्पग्रस्तांची जी आंदोलने झाली मध्ये सर्वात मोठे आंदोलन आहे. आंदोलनात महिलांची उपस्थिती जास्त असल्याचे दिसत आहे. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी भेट दिली. त्यांनी शासनाकडे म्हणणे मांडले आहे. संकलनाचे काम सुरु असुन लवकरच ते पुर्ण होईल असे आश्वासन श्री. तांबे यांनी आंदोलकांना दिले.

Web Title: Marathi news Satara news Koyna Dam