कोयना प्रकल्पग्रस्तांकडून शासनाचा निषेध

जालींदर सत्रे
बुधवार, 7 मार्च 2018

गेल्या 9 दिवसात शासनाने कोणतीही ठोस भूमिका कोयना प्रकल्प ग्रस्ताच्या बाबतीत ना घेतल्यामुळे आणि 9 व्या दिवशीही कोणी अधिकारी यांनी भेट ना दिल्यामुळे कोयना प्रकल्प ग्रस्तानी कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होळी फड शिंपनी आणि आज रंगपंचमी असे कार्यक्रम साजरे करून शासनावर जोरदार टीका करून आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या.

पाटण (जि. सातारा) : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आंदोलन स्थळी रंगपंचमी साजरी करून प्रकल्पग्रस्तांनी शासनाचा निषेध केला. कराड तालुक्यातील ओंड गावच्या शेतकर्यांनी आंदोलनाला आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.

गेल्या 9 दिवसात शासनाने कोणतीही ठोस भूमिका कोयना प्रकल्प ग्रस्ताच्या बाबतीत ना घेतल्यामुळे आणि 9 व्या दिवशीही कोणी अधिकारी यांनी भेट ना दिल्यामुळे कोयना प्रकल्प ग्रस्तानी कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होळी फड शिंपनी आणि आज रंगपंचमी असे कार्यक्रम साजरे करून शासनावर जोरदार टीका करून आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या.

होळीचे सर्व कार्यक्रम साजरे करून होळीचा सण आंदोलन स्थळावर साजरे केले,आजही आंदोलकांनी ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचे हात वर करून ठाम निश्चय व्यक्ती  केला. आज ओंड गावच्या शेतकर्यांनी आंदोलनाला आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. यावेळी दाजी पाटील चैतन्य दळवी विठ्ठल सकपाळ सचिन कदम शैलेश सपकाळ संतोष कदम उपस्थित होते

Web Title: Marathi news Satara news Koyna dam agitation