नगर येथे महामार्ग रुंदीकरणाच्या कामात हलगर्जीपणा

सुनील अकोलकर
रविवार, 28 जानेवारी 2018

तिसगाव (नगर) - तिसगावातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार सुरु झाले आहे. तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. हे काम तातडीने सुरु न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन हाती घेणार आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू आहे. जनतेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत हे काम अतिशय मंद गतीने होत आलेले आहे.

तिसगाव (नगर) - तिसगावातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार सुरु झाले आहे. तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला आहे. हे काम तातडीने सुरु न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन हाती घेणार आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू आहे. जनतेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत हे काम अतिशय मंद गतीने होत आलेले आहे. गावातील दूध शीतकरण केंद्र ते शासकीय विश्रामगृह या एक किलोमीटर अंतरामध्ये दुभाजकासाठी सोडलेल्या जागेत खडी पडलेली आहे. या खडीमुळे सतत अपघात घडत आहेत. कित्येकदा दुचाकीस्वार या खडीमुळे जखमी झाले आहेत. दुभाजकाच्या खड्यामुळे चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. विश्रामगृहाजवळील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. 

तिसगाव मधील ग्रामस्थ भाऊसाहेब लवांडे यांनी, 'रस्त्याच्या बंद पडलेल्या कामामुळे अपघात घडत आहेत. मातीच्या पुलामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकप्रकारे जनतेच्या जीवाशी खेळ चालविला असून प्रशासनाने तातडीने लक्ष न घातल्यास तीव्र रस्तारोको आंदोलन करणार,' असा इशारा दिला आहे. या पुलावर फक्त मातीचा भराव टाकलेला असल्याने येथून वाहने जातांना प्रचंड धुळीचा लोट तयार होतो. मोठी वाहने येथून जात असताना धुळीमुळे अक्षरशः समोरचे काही दिसेनासे होते. या मातीच्या पुलामुळे गुरुवार पेठेतील परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे या भागातील रहिवाशी तसेच व्यावसायिकांना खोकला आदी श्वासोच्छ्वासाचे आजार जडले आहेत. धुळीमुळे दुकानातील माल खराब होत असल्याने आर्थिक फटका या भागातील व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी युवानेते भाऊसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतील रस्त्याच्या कामासाठी व धुळीच्या प्रश्नासाठी अनोखे 'मास्क' आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनानंतर बाजारपेठेतील काम करण्यात आले व धुळीचा त्रास कमी व्हावा, यासाठी रस्त्याच्या कडेने पाणी फवारणी सुरु केली होती. आता ही पाणी फवारणी बंद केलेली आहे. बसस्थानक परिसरात तर इतके खड्डे पडले आहेत की याठिकाणी डांबर दिसेनासे झाले आहे. ठेकेदाराकडून प्रवाशांच्या व जनतेच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तरी प्रशासन गप्प का? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे.

Web Title: marathi news weak construction of the National Highway