श्रमिक मुक्ती दल ठिय्या आंदोलन- मुख्यमंत्री बैठकिस तयार

जालींदर सत्रे 
शनिवार, 17 मार्च 2018

पाटण - श्रमिक मुक्ती दलाने केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे. त्या आंदोलनाची दखल घेवून सोमवारी (ता. १९) कोयना प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीस बोलविले. त्याचे पत्र श्रमिक मुक्ती दलाला मंत्रालयातील महसुल व वन विभागाचे कक्ष अधिकारी पी. एस. ठाकुर यांनी दिले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. दरम्यान, या बैठकीसाठी मध्यस्थी मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव प्रविण परदेशी व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल धरणग्रस्तांनी या दोन अधिकाऱ्यांचे प्रकल्पस्थळी हाअभिनंदन केले.

सलग १८ दिवस कोयना प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यासाठी कोयनानगर येथील शिवाजी महाराज क्रिडांगणावर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. मुख्यमंत्री जोपर्यंत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल या मतावर प्रकल्पग्रस्त ठाम होते. आंदोलनाच्या १६ व्या दिवशी भारत पाटणकर यांनी सरकारला अल्टीमेटम देताना शनिवारपर्यंत बैठकीचे नियोजन झाले नाही तर रविवारी गुढी उभारुन सोमवारी मुंबईकडे प्रस्तान करतील असा इशारा दिला होता.

गुरुवारी मंत्रालय पातळीवर वेगवान हालचाली झाल्या. मुख्यंमंत्री कार्यालयातील सचिव प्रविण परदेशी व सातारचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्पग्रस्तांची यशस्वी मध्यस्थी केली. बैठक निश्चित झाल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी डॉ. भारत पाटणकरांना दूरध्वनीवरुन सांगितले. श्रमिक मुक्ती दलाला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात सोमवारी दुपारी २ वाजता बैठक घेतल्याचे रितसर पत्र दिले गेले आहे. बैठकीचे निमंत्रण मिळाल्याचे कळताच आनंद उत्सव साजरा केला.

आज १९व्या दिवशी धरणग्रस्तांनी कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवे क्रमांक-२, करवडी व उपअभियंता, कोयना पुनर्वसन उपविभाग कोयना या कार्यालयावर मोर्चा काढला व विविध मागण्यांची निवेदने दिली. सोमवारी बैठक होणार असली तरी ठिय्या आंदोलन सुरुच रहाणार आहे. ठरल्याप्रमाणे रविवारी आंदोलनस्थळी प्रकल्पग्रस्त गुढी उभारुन पाडव्याचा सण साजरा करणार आहेत. सोमवारच्या बैठकीतील निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

Web Title: marathi news western maharashtra koyna dam project devendra fadnavis