esakal | ५० दिवसांच्या लॉकडाऊन सुरु झाली ही बाजारपेठ
sakal

बोलून बातमी शोधा

The market started with a 50-day lockdown

कोरोनारोगाच्या पार्श्वभूमीवर गेली पन्नास दिवस बंद असलेले मिरज व्यापारपेठ आजपासून महापालिकेच्या नियमावलीनुसार सुरू करण्यात आली.

५० दिवसांच्या लॉकडाऊन सुरु झाली ही बाजारपेठ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज (जि.  सांगली) : कोरोनारोगाच्या पार्श्वभूमीवर गेली पन्नास दिवस बंद असलेले मिरज व्यापारपेठ आजपासून महापालिकेच्या नियमावलीनुसार सुरू करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने एक दिवस आड उघडण्याचे आदेश असल्यामुळे सोशल डिस्टन्सच्या नियमांचे व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन करत असल्याचे चित्र दिसत होते. शहरात 50 दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सध्या शहरातील होळीकट्टा परिसरात कोरणा ग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे हा परिसर वगळता सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले आहे. चहावाल्या पासून ते मोबाईल दुकाने कपडे सौंदर्यप्रसाधने आणि महत्त्वाची दुकाने आजपासून सुरू झाल्यामुळे शहरातील मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कारण मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वाचा सण म्हणून रमजान सना कडे पाहिले जाते.

सध्या हा सण लॉकडाऊन मध्येच निम्म्याहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. मात्र मुस्लिम धर्मीयांना हा सण साजरा करण्यासाठी आणि खरेदीसाठी बाजारपेठ सुरू झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 

यावेळी व्यापारी असोसिएशने महापालिका प्रशासनास सहकार्य करून कोणत्या बाजूची दुकाने केव्हा सुरू करावी याचे फलक ठीक ठिकाणी उभा केले आहेत. शिवाय सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी दुकानाबाहेर लाकडी बॅरिकेट्‌स उभे केले असून काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचे चौकोन उभे केले आहेत.