विना खर्च लग्न करायचे आहे, मग येथे अर्ज करा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

"सप्तपदी' महत्वकांक्षी योजनेद्वारे सामुहिक विवाह कार्यक्रम एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहे. सौंदत्ती येथे 26 एप्रिल व चिंचलीत 24 मे रोजी सामुहिक विवाह आयोजित करण्याची घोषणा धर्मादाय विभागाने घोषित केली आहे. त्यासाठी अर्जाचे आवाहन केले आहे.

बेळगावः "सप्तपदी' महत्वकांक्षी योजनेद्वारे सामुहिक विवाह कार्यक्रम एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहे. सौंदत्ती येथे 26 एप्रिल व चिंचलीत 24 मे रोजी सामुहिक विवाह आयोजित करण्याची घोषणा धर्मादाय विभागाने घोषित केली आहे. त्यासाठी अर्जाचे आवाहन केले आहे. 

हे पण वाचा - हिंमत असेल तर खरोखरच समोरासमोर येऊन मते मांडा...

येत्या 26 एप्रिल रोजी सौंदत्ती येथील यल्लाम्मा देवस्थानात सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. तर, 24 मे रोजी चिंचली येथील मायक्का देवस्थानात सामुहिक विवाहाचे आयोजन केले आहे. त्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळते. दागिणे, कपडे आणि रोकड मिळून प्रत्येक वधू वराला 55 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेखाली लग्नासाठी अनावश्‍यक खर्च वाचविणे, हा मुख्य उद्देश आहे. सामुहिक विवाहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 27 मार्च अखेरपर्यंत सौंदत्ती येथील यल्लाम्मा देवस्थान येथे अर्ज करावेत. अर्ज वधूसह वरामार्फत केले जावेत. चिंचली येथील सामुहिक विवाहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 24 एप्रिलपर्यंत चिंचली मायक्का देवस्थानाकडे अर्ज करावे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी धर्मादाय विभागाला भेट द्यावी.

हे पण वाचा -  बेळगाव विमानतळावर कोरोनाची धास्ती

सप्तपदी महत्वकांक्षी योजनेद्वारे राज्यात विविध जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांत सामुहिक विवाह झाले. दुसऱ्या टप्प्यामध्ये आयोजित कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामध्ये सौंदत्ती आणि चिंचली येथील धार्मिक ठिकाणांची घोषणा केली आहे. नियोजित कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक झाली आहे. निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी बैठक घेतली. यावेळी सौंदत्ती येथे विचार मंथन कार्यक्रम यासंदर्भात आयोजित केला आहे. नियोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage programme organisation in belgaum district