दिवाळीनंतर लग्न करताय 'हे' आहेत मुहूर्त पण पाळावे लागणार नियम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

कोरोनामुळे साधेपणाने; गुरू, शुक्र अस्तातही मुहूर्त

निपाणी : कार्तिकी एकादशी व द्वादशी गुरुवारी काल (ता. २६) एकाच दिवशी झाली. तुलसी विवाहानंतर आजपासून लग्नसराईला सुरवात झाली. लग्नाचा पहिला मुहूर्त आज होता. कोरोनाच्या घातलेल्या नियम व अटींमुळे धामधूम नसली तरी साध्या पद्घतीने विवाहाची गर्दी असेल.

शयनी (आषाढी) ते प्रबोधिनी एकादशी या काळात चातुर्मासामुळे विवाह होत नसत. यंदा पंचांगात गौण व आपत्कालातील मुहूर्त दिल्याने चातुर्मासासह गुरू, शुक्र अस्तकाळातही विवाह होतील. कोरोनामुळे विवाहासाठी नियम व अटी असल्याने धूमधडाक्‍यात होणारे विवाह साध्या पद्धतीने करावे लागतील. मंगल कार्यालयांनाही केवळ पन्नास जणांच्या उपस्थितीतच विवाह समारंभास परवानगी दिल्याने अडचणी आहेत. विवाहमुहूर्त भरपूर असल्याने लग्नसराईस यंदा ’ब्रेक’ नाही. 

दर वेळी गुरू, शुक्र अस्त व अन्य काही धार्मिक कारणास्तव विवाह मुहूर्त दिले जात नसत. यंदा मुख्यकालातील मुहूर्तासह गौण व आपत्कालीन काळासाठी वेगळे मुहूर्त दिल्याने विवाहेच्छुकांचे मनोरथ पूर्ण होण्यास अडचण नाही. 

लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर- २७, ३० 
डिसेंबर- ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७  
जानेवारी- ३, ५, ६, ७, ८, ९, १० 
फेब्रुवारी- १५, १६ 
एप्रिल- २२, २४, २५, २६, २८, २९, ३०  
मे- १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ 
जून- १६, १९, २०, २६, २७, २८ 
जुलै- १, २, ३, १३

गौण व आपत्कालातील मुहूर्त 
नोव्हेंबर- १८, २०, २१, २२
जानेवारी- १८, १९, २०, २१, २४, २६, ३० 
फेब्रुवारी- १, २, ३, ४, ८, २१, २२, २६, २७, २८
मार्च- २, ३, ५, ७, ९, १०, १५, १६, ३० 
एप्रिल- १, ५, ६, ७

 

३० जूनला थांबलेली लग्नसराई शुक्रवार (ता. २७)पासून सुरू झाली. या मुख्य कालानुसार फेब्रुवारीनंतर गुरु, शुक्र अस्त असल्याने मुहूर्त नाहीत. परंतु, या काळात गौण व आपत्कालीन मुहूर्त आहेत. विवाहासाठी मुख्य कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे. अगदीच गरज पडल्यास गौण व आपत्कालीन मुहूर्ताचा विचार करण्याचे आवाहन दाते पंचांगात केले आहे.
- शरद जोशी, पुरोहित, बेनाडी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage rules and regulations in belgaum