शाब्बास!! : महिला बचत गटांनी विकले इतक्या लाखांचे  मास्क; इतके बनवले मास्क

Masks worth millions sold by women's of self-help groups
Masks worth millions sold by women's of self-help groups
Updated on

सांगली ः लॉकडाऊन काळात सर्वच व्यावसायिकांचे अर्थचक्र थांबलेले असताना बचत गटातील महिलांसमोरही आव्हान उभे होते. परंतु त्यांनी कल्पकता दाखवत व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या. "कोरोना' मुळे मास्कची मागणी प्रचंड वाढल्याने ही सुसंधी महिला बचत गटांनी साधली. जिल्ह्यातील 182 महिला बचत गट मास्क शिलाईसाठी सरसावले.

लॉकडाऊन काळात कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला. गटांनी एकत्रित इचलकरंजी या ठिकाणाहून कच्चा माल मागवून घेतला. त्यापासून अडीच महिन्यात कापडी, धुवून वापरता येतील असे 2 लाख 90 हजार मास्क शिवून जिल्हाभर माफक किंमतीत विक्री केली. त्यातून तब्बल 20 लाखांची कमाई बचत गटातील महिलांना केली. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केलेल्या मार्गदर्शनातून भाजीपाला, फळे विक्रीची यंत्रणा राबवली. औषधी दुकाने, रूग्णालये, जिल्हा परिषदेसह सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालये येथे मास्क पोहोचवले. लॉकडाऊन काळात अनेक गटांनी भाजीपाला, मसाले व चटण्यांचीही उलाढाल केली. प्रसंगी घरोघरी जाऊन विक्री केली. शेतकऱ्यांनाही आधार मिळाला. तत्कालीन सीईओ अभिजित राऊत, प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा व्यवस्थापक अतुल नांद्रेकर, महेश गायकवाड, स्वरांजली वाटेगावकर यांनी सहाकर्य केले. 

मास्कची 8-10 रुपयांना विक्री 

बांबवडे (ता. पलूस) येथील साईकृष्णा महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा पवार म्हणाल्या,""एप्रिल, मे मध्ये बचत गटांमार्फत सात हजार मास्क शिवले. ते सूर्यगाव, वाघोली व गरजेवाडी ग्रामपंचायत, गावातील मेडीकलमध्ये तसेच कोल्हापूर येथेही मास्क 8 ते 10 रुपयांनी विकून फायदा कमवला. 

शिरसगाव (ता. कडेगाव) येथील रमाई महिला बचत गटाच्या सदस्या वनिता सकटे म्हणाल्या,""गटामार्फत 4 हजार मास्क 10 रूपये दराने शिरसगाव, बोंबलवाडी ग्रामपंचायतींना दिले.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com