पाच दिवसांपासून टपाल कार्यालयातील कामकाज ठप्प; बीएसएनलचे दुर्लक्ष

पाच दिवसांपासून टपाल कार्यालयातील कामकाज ठप्प; बीएसएनलचे दुर्लक्ष

मसूर (जि.सातारा) : येथील रेल्वे स्टेशननजीक पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीची आॅपटिकल फायबर केबल (ओएफसी) तुटल्याने त्यावर अवलंबून असलेली टपाल कार्यालयातील यंत्रणा ठप्प झाली आहे. टपाल कार्यालयातील संगणकाची यंत्रणा बंद पडल्यामुळे आर्थिक व्यवहारांसह अन्य कामकाजावर परिणाम झाला आहे. दूरध्वनी खात्याचे दुर्लक्ष व निष्काळजीपणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

विभागातील 35 गावांचे मसूर हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र आहे. किराणा, कापड तसेच अन्य व्यवसायातील मोठी आर्थिक उलाढाल होत असते. शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था या ठिकाणी आहेत. पाच दिवसांपासून मसूर-उंब्रज रस्त्यावर येथील रेल्वे स्टेशननजीक दूरध्वनी खात्याची केबल तुटल्याचे सांगण्यात येते. मात्र, संबंधित खात्याकडून पूर्ववत जोडण्यात आली नाही. त्यामुळे पोस्ट कार्यालयातील कामकाजाची यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे.

या कार्यालयातील सेवा दूरध्वनी खात्याच्या सेवेवर अवलंबून आहे. यंत्रणाच ठप्प असल्यामुळे आर्थिक व्यवहार, रजिस्टर, सुकन्या समृध्दी योजना, किसान विकास पत्र, बचत गटांसह अन्य कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे. केबल जोडण्याबाबत दूरध्वनी खात्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्राहकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ये जिंदगी का सवाल है, करो ये प्लीज, दरख्वास्त है करो


जमावबंदीच्या काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत

कुडाळ (जि.सातारा) : येथे महिन्यापूर्वीच मुख्य रस्त्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सध्याच्या जमावबंदीच्या काळात पोलिसांना चांगला उपयोग होत आहे. जमावबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होते किंवा कसे याबाबत पोलिसांकडून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवर करडी नजर ठेवली जात आहे.
 
पोलिस स्थानकातून साउंड सिस्टिमच्या माध्यमातून बाजारपेठेत विनाकारण वाहतूक, गर्दी केली तर थेट कंट्रोल ठेवला जात आहे, तसेच चौकाचौकांतील रस्त्यांवरील वाहनांचीही कसून तपासणी सुरू आहे. कुडाळसह- करहर, सायगाव, मेढा या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर अनावश्‍यक कोणीही फिरत नाही. कुडाळ येथील भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेतील मूळचे ठिकाण बदलून बाजार समितीच्या पटांगणात भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना बसवण्यात आले आहे. किराणामाल व मेडिकल दुकाने चालू ठेवण्यात आली असून, तेथेही शिस्तबद्ध पद्धतीने ठराविक अंतर ठेऊनच ग्राहकांना माल दिला जात आहे. 

जमावबंदीच्या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक संतोष चामे यांनी बोलताना दिला. औषध, भाजीपाला, किराणामाल खरेदी करण्यासाठी व दवाखान्याला जाणारे रुग्ण व शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय रस्त्यावर कोणी फिरत नाही. परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. भाजीपाला, धान्य व दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांशिवाय इतर कोणत्याही वाहनास परवानगी नाही. जमावबंदीच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अत्यंत सतर्क असून, चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. आवश्‍यक ती गस्तही वाढविण्यात आल्याचेही तात्या शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. 
Lockdown : आता रे ! सरपंचांच्याच घरात घुसला बिबट्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com