esakal | मायाक्कादेवी यात्रा रद्दमुळे चिंचलीत एेतिहासिक शुकशुकाट

बोलून बातमी शोधा

mayakka devi yatra chinchali}

चिंचली येथे पोलिस बंदोबस्त कडक असून चारही बाजूने येणारे रस्ते रोखले आहेत

मायाक्कादेवी यात्रा रद्दमुळे चिंचलीत एेतिहासिक शुकशुकाट
sakal_logo
By
एम. ए. रोहिले

रायबाग : कर्नाटक-महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्कादेवी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. यात्रेस २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. मंगळवारी (ता. २) यात्रेचा मुख्य दिवस असूनही येथे एेतिहासिक शुकशुकाट जाणवला. केवळ पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीचे धार्मिक विधी झाल्याचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव सरकार यांनी सांगितले. 

चिंचली येथे पोलिस बंदोबस्त कडक असून चारही बाजूने येणारे रस्ते रोखले आहेत. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मायाक्कादेवीची यात्राच रद्द केल्याने भाविकांनी न येण्याचे आवाहन यात्रा कमिटीसह पोलिसांनी केले होते. त्यास लाखो भाविकांनी प्रतिसाद दिला असला तरी देवीवरील भक्ती व श्रद्धेपोटी शेकडो भाविक येत आहेत. पण पाच-सहा दिवसांपासून पोलिसांकडून त्यांना परत पाठवून देण्यात येत आहे. 

चिंचलीतील प्रसिद्ध मायाक्कादेवी यात्रेस २६ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. मंगळवारी (ता. २) मुख्य दिवस होता. या दिवशी मायाक्कादेवीचा महानैवैद्य (बोनी) व पालखी महोत्सव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव सरकार, मानकरी व पुजाऱ्याच्या उपस्थितीत झाला. ७ मार्चअखेर ही यात्रा चालणार आहे. पण यंदा प्रथमच यात्रा रद्द झाल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट पसरला आहे.

पोलिसांकडून गावच्या सर्व बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हत्ती व कुडचीचे पोलिस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. 

हे पण वाचा - कोविड खरेदीची कॅगमार्फत चौकशी करा ; कोल्हापूर जिल्हा परिषदेत सदस्यांची मागणी 


कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प

देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातून लाखो भाविक येतात. मात्र यात्रेवर बंदी घातल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. यात्रेमध्ये दरवर्षी कोटय़वधी रूपयांची उलाढाल होते. चिंचलीत जनावरांचा मोठा जनावरांचा बाजार भरतो. मात्र यात्राच रद्द झाल्याने व्यापारी, खेळणीवाले व व्यापाऱय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. मंदिराच्या परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
 
चिंचलीतील मायाक्का देवीचे लाखो भक्त कर्नाटक-महाराष्ट्रात आहेत. ते श्रद्धेने दरवर्षी यात्रेस येतात. पण यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने देवस्थान कमिटी व पोलिसांनी केलेल्या न येण्याच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला. मानकरी व पुजाऱयांच्या उपस्थितीत देवीचे धार्मिक विधी परंपरेनुसार होत आहेत.
-जितेंद्र जाधव सरकार, अध्यक्ष, मायाक्कादेवी देवस्थान, चिंचली.


संपादन - धनाजी सुर्वे