esakal | दिवाळी फराळाच्या गोडव्यानंतर मटण, चिकन दुकानांसमोर रांगाच रांगा; भाव ही तेजीत
sakal

बोलून बातमी शोधा

Meat chicken eggs Shops Crowds of eaters belgaum

हिवाळ्यामुळे भाव वधारले; हॉटेल व्यावसायिकांनाही दिलासा

दिवाळी फराळाच्या गोडव्यानंतर मटण, चिकन दुकानांसमोर रांगाच रांगा; भाव ही तेजीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : दिवाळी फराळाच्या गोडव्यानंतर खवय्यांची मांसाहारावर ताव मारण्यासाठी गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे रविवार आणि बुधवारी मटण, चिकन, अंडी दुकानावर ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान हिवाळ्यामुळे मांसाहाराचे भाव तेजीत आहेत. 

दिवाळीत घरोघरी गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. आप्तस्वकीयांसह मित्रपरिवाराला घरी फराळाला बोलाविण्याची प्रथा आहे. फराळातील गोड पदार्थ आणि मिठाई खाऊन कंटाळलेल्यांचा पावले चमचमीत खाण्याकडे वळत आहेत. चमचमीत आणि खमंग खाण्याच्या इच्छेतून घरोघरी आणि हॉटेलातही मांसाहाराचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा- 5 लाख खर्चून काळ्या दगडात बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूत घडलेल्या व्यक्तिमत्वांवर एक नजर -

बहुतांश हॉटेलमध्ये तसेच केटरिंगवाल्यांकडून चिकन, मटण बिर्याणी, पुलाव, भाजी बनवून पर्यटनस्थळी किंवा निवांतात घरी मांसाहारावर ताव मारण्यात येत आहे. मटण, चिकन, मासे, अंडी आदींना पसंती दिली जात आहे. शहराच्या विविध भागांत मटण दुकानावर दररोज सकाळ-सायंकाळी गर्दी होत आहे. हिवाळ्यामुळे काही दिवसांपासून केटरिंग व्यवसायही तेजीत आहे.

दिवाळीत हॉटेल आणि चिकन, मटण विक्री व्यवसायावर परिणाम झाला होता. सण संपल्यापासून ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिकन आणि मटणाची मागणी वाढली आहे.
- आरिफ ताडे, चिकन, मटण विक्रेता, निपाणी

मांसाहार प्रकार               प्रतिकिलो दर 

मटण                              ६०० ते ६२०
चिकन बॉयर                    १८० ते २००
गावरान चिकन                 ३५० ते ४००
मासे                                १०० ते १०००
बॉयलर जिवंत कोंबडी       १३०
गावरान जिवंत कोंबडी      ४००

संपादन- अर्चना बनगे

loading image